प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी
   
 
नामकरण विधी दि.7.2.2010
हंस लडिवाळे, राजसबाळे,आज तुझे बारसे,
फुलराणी तू, सजलीस, नटलीस,नांव ठेवू छानसे
कुरु कुरु कुरु कुरु करून आई,कानी सांगते नांव,
अनामिकेचे आज बारसे,      ठेवले नांव.

हालवुनी पाळणा गातसे अंगाईगीत
इवली इवली, सानुली छकुली निजली दिमाखात धृ.
दिनांक तेरा जानेवारी, वीस दहा साल
जन्मठिकाण माधव मेमोरीअल हॉस्पिटल
सात एकोणिस संध्याकाळी तू अवतरलिस
कृष्णचतुर्दशी पौष मास या तिथिला आलीस हालवुनी पाळणा (1)

फसवलेस तू येते येते म्हणुन आम्हाला
जन्माआधीच लपाछपीचा खेळ तुला सुचला
निराश होऊन आई आली सकाळी परतून
पहात होतीस गंमत आईची आत तू लपून हालवुनी पाळणा (2)

होते आरक्षण कां बाळे दिनांक तेराचे
म्हणुन आगमन तुझे लांबले येथे येण्याचे
फ्लाईट चुकली तुझी,परतली तशीच घरी संपदा
करू साजरी अत्यानंदे दीपावली यंदा हालवुनी पाळणा (3)

विक्रम झाला पिता तुजमुळे,संपदा ही माता
आनंदीआनंद पसरला चहुंकडे आता
आजीआबा होते आधीच,घरची मिळे पदवी मान
अमोल,थोरवी त्याची काय कुणी गावी हालवुनी पाळणा (4)

बाळीमागुन घरात येतील कितीतरी खेळ
कसा मिळावा घरातल्याना कधि निवांत वेळ
आजीआजोबाना झाले ठेंगणे आभाळ
टिकवणार ना जागेवरती एक वस्तू बाळ हालवुनी पाळणा (5)
 
प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी