प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी
   
 
गीत कृष्णायनातील गीत क्र.1/38
कंसराज शब्द हे मनांत साठवा
वधिल तुम्हा देवकीचा पुत्र आठवा  धृ.

हितशत्रू जगी अमाप, दुर्मिळ पण हितकर्ता
धावलो मी तुजसाठी, कानी पडता वार्ता
प्रिय जगांत अससी तू मजसी बांधवा (1)

भरंवसा न देवांच्या, मनातल्या गणिताचा
आडवळणी त्यांची चाल,थांग नसे हिकमतीचा
फसवुनी धुळीस मिळवतील वैभवा (2)

गोष्ट सांगतो हिताची,पटली तर स्वीकार
सोड दया,माया, वध, जे जे जन्मेल पोर
नाशुया उपजताच, जरी काजवा  (3)

क्षम्य सर्व युद्धात, कुटिल नीती अंगिकार
रुजण्याआधीच रोप, नष्ट करी बीजांकुर
सल्ला हा तुज मानी अमोल अनुभवा (4)

देवकीचे संतान, श्रीविष्णूभगवान,
आठव्या क्रमांकाने,,येऊन करणार हनन
उपजताच मालव, वसुदेव कुलदिवा (5)

वावरतो देवांत, जाणतसे सर्व गुपित
प्रिय तुजला जर जीवित,कर देवांवरती मात
ठेचावे दिसताक्षणी, क्रुर विंचवा (6)

कंसराज सावधान, कर दोघा बंदिवान
आता घेतो निरोप, 'नारायण,नारायण'
राहे नको गाफिल, मुकशील रे जीवा (7)धृ.

कंसराज शब्द हे मनांत साठवा,
वधिल तुम्हा देवकीचा पुत्र आठवा  
 
प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी