| |
¹ãõÔãã ½Ö¥ã•ãñ ÔãÌãÃÔÌã ¶ããÖãè,‚ãÔãñËÔã죪㠦ãñ ŒãÀñ
¹ã¥ã,¹ãõÔãã ØããâŸãè ¶ãÔãñË ¦ãÀ ‡ãŠãâÖãèÔã죪㠶ããÖãè ŒãÀñ
•ã¶½ãã¹ããÔãì¶ã ½ãÀñ¹ã¾ãĦ㠾ãñ¦ãã•ãã¦ãã ¹ãõÎããâÎããèÞã Ôãâºãâ£ã
ªñÖ ½Ö¥ã•ãñ •ã¶½ãã¹ããÔãì¶ã ªìŒã¥ãñ,¹ãñõÎããâãäÌã¥ãã Öãñ¥ãñ ¶ããÖãè ºãÀñ.
|
निरुपद्रवी मुंगी कडकडुन डसते
अंगावर तिच्या पडता पाय
जगण्यासाठी प्रतिकार हवा
डसणे शस्त्र, होता निरुपाय
प्रगती करा, निसर्गाशी
जमवुन घेत, घालुन समजुत
दोस्ती करा, पर्यावरण राखा
मित्रच आहेत एकेक पंचमहाभूत
|
|
पैसा वाहते पाणी
बचत करून, अडवा, वाढवा
पैशाची चाल संथ
श्रमाने यायची त्याची गती वाढवा
पैसा, बुळबुळित साबण
सटकण्याआधी वर आवरण चढवा
लक्ष्मी अखेर स्त्री
आवडते घरात शांतता, कुटुंबात गोडवा
|
|
तुमच्या आमच्या चुकीने मरा
मेल्यावर लक्षाधीश, जखमी कांही हजार,
गरीब हटले, गरीबी हटली,
वा रे वा!किती दयाळू सरकार.
|
|
जन्म घेताच,तीन घेणेकरी,दे दे म्हणुन मागे लागतात.
त्यांमध्ये एक आपला देह,दुसरा देव व तिसरा देश असतो.
ऋण आपल्यावर,त्यांचे देणे देणे,प्रत्येकाचे कर्तव्य असते
ऋण फिटता फिटेना,फेडण्यासाठीच पुन्हा पुन्हा इथे येणे असते.
|
|
इवलीशी जिभली
चळवळी म्हणुन तिला तोंडामध्ये कोंबली
आगडोंब पेटवते
तोंडपट्टा चालवते, ,जर कां पिसाळली
प्रेम दयासागर
जेव्हा केव्हा, मन:स्थिती शांत व चांगली
फणा सांभाळावा,
सांभाळावी सर्वानीच,ही वाणी आपापली
|
|
नाजुक देहाला जपण्यासाठी
थंडीमध्ये स्वेटर व मफलर
पायांची काळजी घेण्यासाठी
पायांत मोजे व पादत्राण
तो,म्हणजे,आपला प्राण
गेला की सर्वच संपले
जीव वाचण्यासाठी सुद्धा शहाणे
घालत नाहीत शिरस्त्राण
|
|
बाबा आम्हाला वाटतो तुमचा अभिमान
तुम्ही आम्हा सर्वांचे जीव की प्राण,
जाताना पापा,मोरुचा न विसरता घेता
पण विसरता घालायला शिरस्त्राण?
पा:पाकीट,पा:पास,मो:मोबाईल,रु.रुमाल,चा:चाव्या
|
|
अशा जागी बसावे
तिथुन ऊठ कुणी म्हणणार नाही
तिथे बसु नये
जिथे बसणे योग्य होणार नाही
ज्याने त्याने आपापली
पायरी सांभाळुन वावरावे
उगाच वावगे वागुन
अपमान करुन कां घ्यावे?
|
|
|
|
|
|
|
|