प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी
   
 
व्हॅलेंटाईन डे स्पेशल
प्रियकरापासुन सावध रहाण्यासाठी
 मुलीनीच पर्समध्ये बाळगावे आता कंडोम
अनावर भावना,आक्रमक पुरु
मिळेल संरक्षण,जरी पेटला रतिहोम
आपणहुन खरंतर,दोघांनी बाळगावा संयम
 ओलांडु नये,लग्नाआधी लक्ष्मणरेषा
पण,ती वेळच असते व अविचार घडतो
 संयमच सुटतो,मादक वेष व भूषा

गुल आणि गुलु जेव्हा प्रथम जवळ येतात
गुलुगुलु गप्पागोष्टी काय बरे करतात
तो बोलतो बंद डोळ्यांनी ती ऎकत असते
ती बोलते, सारे जवळ येण्यासाठी असते
प्रेमी जनांच्या गप्पांन फक्त सुरवार असते
निरोप घेणे कुणालाच आवडणारे नसते
अखेर निरोप घ्यायलाच लागतो,घरी जायचे असते
हात सोडवत नाही, तरी दूर व्हायचे असते

(2)
प्रेमी जनांचे चोरुन भेटणे, जुनीच आहे कथा
प्रेमी जनच जाणु शकतात,प्रेमी जनांची व्यथा
अर्जुन आणि सुभद्रा, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी
धीट अमर प्रेमवीर,कथा जरी जुनी पुराणी
एकमेकांशी बोलणे,भेटणे फार अवघड नाही
प्रेम आहे माझे तुझ्यावर म्हणणे सोपे नाही
भीड चेपल्यावर दोघेजणही फिरतात जोडीने
वारंवार भेटता,बोलता, जुळु लागतात मने

(3)
एखादे माणूस आवडले की मनात घर करते
घर केलेले माणूस नकळत ह्रुदयामध्ये शिरते
मग,अभ्यास सुचत नाही की जेवण रुचत नाही
आवडती व्यक्ती सारखी सारखी,डोळ्यात उभी राही
गुलाबफुल नव्हे ,माझे ह्रुदय बघ तुला मी दिले
मनातील अबोल ह्रुद्गत कानात सांगतील तुला फुले.

(4)
आजचा दिवस प्रेमाचा, प्रेम व्यक्त करण्याचा
माझे तुझ्यावर प्रेम आहे,हे उघड करण्याचा
        रेंज आपली जुळेल का
        दोस्ती आपली जमेल का
जवळ येऊन,जवळ घेऊन,दाट जवळीक साधण्याचा
आजचा दिवस, आपला दिवस,समजुन उमजुन घेण्याचा.

(5) आजचा दिवस आगळा वेगळा
             आनंद भरला अवघा दिशात दाही
    उल्हासात,आनंदात,नाचा बागडा
             विचाराना,विकाराना थारा नाही
(6)
माझे तुझ्यावर प्रेम आहे,तुझे माझ्यावर आहे का
सरळ सरळ विचारणे अतिअवघड,नकाराचा त्यात आहे धोका
           पण कधितरी जे विचारायचे ते विचारायलाच हवे
           आजचा दिवस त्यासाठी,धाडस करायलाच हवे
गुलाबफुल दिले, तू स्वीकारलेस तर मनातील फिटतील शंका
पुन्हा पुन्हा भेटुन तुला, अतीव प्रेमभराने लाडीक मारीन हांका.

(7)
राग,द्वेष,असूया,हेवा, यांना आज थारा नाही
दशदिशा हाच संदेश,आज जगात पसरत राही
प्रेम,प्रेम,प्रेम,म्हणजे फक्त प्रेमीजनांचेच नसते
जन्मताक्षणीच जीवाशिवांचे जुळते हे प्रेमनाते
धागे जुळताक्षणीच कुणीही कुणावरही प्रेम करावे
मिळता त्याला अनुरुप साद,आनंदामृताने न्हावे.

(8)

किती समजवावे,किती विनवावे,ऎकतच नाही प्रियकर,
डळमळता होतो प्रियेचा, त्या अप्रिय क्रियेला विरोध
ऎकतच नाही, माझे निदान एवढे म्हणणे तरी ऎक
करायचं ते करून टाक, पण देते ते वापरून निरोध
संशय घेतला, की कां बाळगते ही हे जवळ साधन
समजावे हा संशयात्मा आहे,नाही मित्र मनासारखा
बरे झाले वेळीच कळला याचा हा संशयी स्वभाव
निरोधाला रहा ठाम, पत्करू नका प्रेग्नंसीचा धोका

 
प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी